युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत मुंबईच्या वतीने महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा सत्कार

मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) : युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतच्या मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कोरोनासारख्या महामारीमुळे मुंबईला खीळ बसली. सगळ्या जगाचे लक्ष महा मुंबईकडे असताना आजारी मुंबईची ज्या धीराने त्यांनी सेवा केली. संपूर्ण जगाला आदर्श असे मुंबई मॉडेल दिले. एखाद्या रुग्णाला परिचारिका पूर्ण उपायाने, मायेने बरी करते तसे पूर्ण मुंबईला आपण ठणठणीत बरे केले, आणि अश्या कर्तबगारीने लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल मुंबईच्या आदर्श प्रथम नागरिक – महापौर म्हणून सौ. किशोरीताई पेडणेकर यांचा UHRC मुंबई टीम कडून जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी UHRC च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जितेंद्र दगडू सकपाळ, आशेरमुख फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि UHRCच्या ठाणा पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.अनिता घोष, किशोर घोष, रायगड जिल्हा अध्यक्ष मंगेश डफळे, मुंबई जिल्हा अध्यक्ष अमोल वंजारे, मुंबई उपसचिव संदिप मोहिते, दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जॉइजोडे, चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज, अध्यक्ष सुहास परब, सदस्य संजीव परमार, विवेक माने, अंजली भोसले, मंगेश सावंत, वासुदेव सुतार, नीरजा सकपाळ, श्रावणी वाळुंज व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here