‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावर परिषद

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे ११ जुलै रोजी ‘कोविड पश्चात काळातील शिक्षण’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद हॉटेल रॅडिसन (गुरुग्राम ,दिल्ली ) येथे होणार आहे.

डॉ रिपुरंजन सिन्हा हे ‘कोविड पश्चात काळातील उच्च शिक्षण’या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.डॉ. प्रियदर्शिनी नायक या ‘कोविड पश्चात काळातील शालेय शिक्षण’या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल हे ‘किंगडम ऑफ टोंगामधील संशोधनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ योगेश चंदना (इव्हॅल्युएशन कमिशनर ऑफ इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन ऑर्गनायझेशन),साफी अख्तर (प्रशासकीय सचिव,ऑल इंडिया मिली कौन्सिल) हे मान्यवर या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here