शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक आज दिनांक १० जुलै रोजी मुंबई प्रदेश कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीचे उद्घाटन प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांतजी भारती व उद्योग आघाडीचे प्रभारी, प्रदेशाचे प्रवक्ते विश्वासजी पाठक प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी पेशकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

याप्रसंगी माजी कृषिमंत्री अनीलजी बोंडे, विश्वासजी पाठक व श्रीकांतजी भारती, प्रदीपजी पेशकार यांचे मार्गदर्शन लाभले.प्रदेश सहसंयोजक सुधीरजी धुत्तेकर , समन्वयक रविशजी मारू उत्तर महाराष्ट्र संयोजक तथा शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांसह सर्व जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केलेल्या व सध्या करीत असलेल्या शिर्डीतील विविध विकास कामांचे कौतुक केले व त्यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.





