कोपरगाव आणि राहाता तालुका प्रहार टीमकडून निराधार दिव्यांग महिलेच्या उदरनिर्वाहासाठी दिले शिलाई मशीन भेट

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) : राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रभरातून प्रहारचे मावळे जन्मदिन सप्ताह साजरा करत आहेत. हेच औचित्य साधून प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष कोपरगाव आणि राहाता यांच्या अथक परिश्रमातून कोपरगाव येथील एका निराधार दिव्यांग महिलेला उच्च प्रतीचे शिवण मशीन वितरित करण्यात आले आहे.

निराधार दिव्यांग ताईला आपले कुटुंब चालविण्यासाठी आधार निर्माण व्हावा यासाठी कोपरगाव आणि राहाता प्रहार टीम एकत्र येऊन संगीताताई सोनवणे यांना विनामूल्य शिवण मशीनचे लोकार्पण केले आहे. दिव्यांग बांधवांचे हृदयस्पर्शी नेतृत्व राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांच्या पावलावर पाऊल ठेवत. “निराधार दिव्यांग बांधवाना प्रहारचा आधार ही उक्ती जपत” राहाता व कोपरगाव प्रहार टीमने हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यानंतरसुद्धा तालुक्यातील दिव्यांग बांधवाना कुठल्याही प्रकारचे शासकीय सहकार्य लागले तर या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी सक्षम आणि कटिबद्ध असू असे आश्वासन यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा संघटक परमेश्वर कराळे, कोपरगाव दिव्यांग तालुकाध्यक्ष शरद खिलारी, शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे यांनी दिले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजुभाऊ वाकचौरे, विनोदभाऊ राक्षे, दिनेश कांबळे, रवींद्र रोहमारे, गिरीश नारंग, विरेन बोरावके या सर्व तरुण तडफदार आजी नगरसेवक टीमची होती. तसेच मनसे तालुकाध्यक्ष अनिभाऊ गायकवाड, किशोरभाऊ डोखे, समाजसेवक डुकरे साहेब उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस अभिजित भाऊ पाचोरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रहार जनशक्ती पक्षाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके, कोपरगाव शहराध्यक्ष दिपक पठारे, संदिप लोहकरे, कलिम शेख, उपाध्यक्ष विजयजी काकडे, संघटक वसंतराव काळे, समनवयक जगन्नाथ सरोदे, निमगाव शहर अध्यक्ष सचिन आरने, योगेश गंगवाल आदी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट – कोपरगाव तालुक्यात सर्व गावांमध्ये गाव तिथे प्रहार शाखा स्थापना करून अपंगांचे विधवांचे निर्धार यांचे प्रश्न व विविध शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणार असल्याचे आश्वासन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here