विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे नामदार पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

मुंबई (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : शुक्रवारी रोजी संघटनेचे माजी सहसचिव अभिजीत शिंदे यांच्या पुढाकाराने नगरविकास तथा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात स्कुलबस वाहतूक व्यावसायिकांवर लॉकडाऊन काळात कोसळलेल्या अडचणींबाबत भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी महासंघातर्फे नागपूर विभागातील अफसरखान व त्यांचे सहकारी , सोलापूर जिल्ह्य़ातील संतोष जाधव व त्यांचे सहकारी , अमरावतीहून बंडू खातिलकर व त्यांचे सहकारी, अंधेरी मुंबई येथील सिध्दिक शेख उपस्थित होते. वि. वा. संघटणा ठाणे अध्यक्ष मनोज पावशे , सचिव दिलीप पाठक, सहखजिनदार सुरेंद्र भोगले , संपर्क प्रमुख योगेश कांबळे उपस्थित होते.

eknath-shinde
नामदार एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या अडचणींबाबत थोडक्यात चर्चा केली. व आपल्याशी संवाद करू अशी सकारात्मकता दर्शविली. नंतर अजित पवार उपमुख्यमंत्री, अनिल परब परिवहन मंत्री, शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन देण्यात आल्याची माहिती वि.वा.संघटणा ठाणे सचिव दिलीप पाठक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here