खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा मुंबईने केले जेरबंद.

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : शनिवार दिनांक १०/७/२१ रोजी पहाटे ०५.०० वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवन नगर साई बाबा मंदिरा जवळ ऑफ विरा देसाई मार्ग,अंधेरी प मु- ५३ येथे यातील अटक आरोपी हा रात्रपाळी ड्युटी करून अचानक लवकर घरी आल्यावर त्याच्या पत्नीला मयत ईसमा सोबत पाहिल्याने व संशय आल्याने रागाच्या भरात आरोपीने मयत इसमाच्या शरीरा वर चाकूने सपासप वार करून हत्या केली व पळून गेला म्हणून आंबोली पोलीस ठाणे गु र.कर ५५६/२१ कलम ३०२, ५०६ (२) , ३२३,भा द वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा घडल्याचे माहिती वरून गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली की, नमूद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा मक्कावाडी, ॲन्टाॅपहील परीसरात लपून बसला असून तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे.

सदरच्या माहितीवरून लागलीच गु.प्र.शा. गुअ.वि. कक्ष ४ चे एक पोलीस पथक निर्माण करण्यात आले. सदर पथक नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना नमूद पाहिजे आरोपी मक्कावाडी ॲन्टाॅपहील वडाळा मु -३७ परिसरात मिळून आल्याने पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेण्यात आले व कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.नमूद आरोपीस कायदेशीर बाबांची पूर्तता करून पुढील तपाासकमी आंबोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी ही सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त प्रकाश जाधव, सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि बिराजदार , पो.ह. ३४२७९ कांबळे, पो.ह. ९६०६३३ बल्लाळ, पो.ह. ३०५९३ उत्तम बोटे , पो.ह. २८७९० सावंत,साळुंखे, पो.शि. ०७१५२१ जगताप पो.शि.०९२११४ रोटे यांनी पार पाडलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here