स्थानिक नागरिकांनाचेही मोठं नुकसान
धर्मशाळा : हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा भागातील भागसू नाग परिसरात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुराचं पाणी अनेक घरांत घुसलंय. प्रशासनानं नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नद्यांच्या प्रवाहात उतरून आपला जीव धोक्यात टाकू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.
हिमाचल प्रदेशचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘मॅक्लोडगंज’मध्ये ढगफुटी झाल्यानं आणि मुसळधार पावसानं भागसू नागमधला छोटा ओढ्या भरून वाहतोय. पाण्याची पातळी वाढल्यानं ओढ्यालाही नदीचं स्वरुप आलंय. या ओढ्याच्या आजुबाजुला वसलेल्या हॉटेल आणि व्यावसायिकांनाही मोठं नुकसान सहन करावं लागलंय. निसर्गाचं हे रुप पाहून पर्यटकही धास्तावलेत.
#WATCH Around 10 shops damaged as Manjhi River rages following heavy rainfall in Himachal Pradesh's Dharamshala pic.twitter.com/m98H2O6Ank
— ANI (@ANI) July 12, 2021
भागसूनाग शाळेतही यामुळे नुकसान झाल्याचं समोर येतंय. धर्मशाळेत शिला चौकाजवळ पाणी घुसल्यानं एक तीन मजली घर उद्ध्वस्त झाल्याचंही समोर येतंय. प्रशासनाला मदतीसाठी या भागात पोहचण्यातही अडथळे जाणवत आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं रस्तेही बंद झाले आहेत.
#WATCH Flash flood in Bhagsu Nag, Dharamshala due to heavy rainfall. #HimachalPradesh
(Video credit: SHO Mcleodganj Vipin Chaudhary) pic.twitter.com/SaFjg1MTl4— ANI (@ANI) July 12, 2021
ढगफुटीच्या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओतून इथली धडकी भरवणाऱ्या परिस्थिती दिसून येतेय. या व्हिडिओत अनेक गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत.






