शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने राहाता तालुक्यातून “शिवसंपर्क अभियानाचा” शुभारंभ शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व मोलाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, माजी जिल्हाप्रमुख सुहास बापू वहाडणे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते पाटील, माजी नगराध्यक्ष धनंजय भाऊ गाडेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र भाऊ पठारे, नगरसेवक सागर भाऊ लूटे, जिल्हा संघटक विजय भाऊ काळे, माजी उपजिल्हाप्रमुख नानासाहेब बावके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल भाऊ बांगरे, जेष्ठ नेते अशोक मामा थोरे, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंदराव सिनगर, भारतीय कामगार सेनेचे डी.डी.पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा.संजय आप्पा शिंदे, उपतालुकाप्रमुख भास्करराव मोटकर, राहाता शहराचे शहरप्रमुख मा.गणेश सोमवंशी, शिर्डी शहराचे शहरप्रमुख मा.सचिन भाऊ कोते, युवासेनेचे प्रताप निर्मळ, अमोल गायके, रविंद्र सोनवणे, महेश कुलकर्णी, सुभाष उपाध्ये, भागवत लांडगे, अनिल पवार, जयराम कांदळकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून यापुढे अभियानांतर्गत गावागावात शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या जाणार आहेत.







