महाकवी कालिदास दिन उत्साहाने साजरा

मुंबई (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .जेष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे ह्यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली .”पाऊस ,कविता आणि आपण ” ह्या विशेष काव्यमय कार्यक्रमातून त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले .आपल्या कवितांतून पावसाची विविध रूपे दाखवताना त्यांनी सुमधुर आवाजातून श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला .बा भ. बोरकर ,अशोक बागवे ,ग्रेस आणि इतर साहित्यिकांच्या पावसाच्या कवितांची ओळख त्यांनी करून दिली .

सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित कवी कवयित्रींना त्यांचे मार्गदर्शन लाभले .सलोनी बोरकर ह्यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. साहित्यसंपदाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना संस्थापक वैभव धनावडे ह्यांना आगामी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

कालीदासांचा परिचय उपस्थितांना करून देण्या सोबतच त्यांच्या साहित्याचा परिचय संस्कृत अभ्यासक नमिता जोशी आणि आदिती कोटीभास्कर ह्यांनी करून दिला. भावी पिढीला कालीदासांची माहिती व्हावी आणि कवितांच्या रूपात साहित्याची गोडी निर्माण व्हावी ह्या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम पार पडला.उपक्रम प्रमुख म्हणून वंदना मत्रे ह्यांनी काम पहिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here