बोरगाव देशमुखचे ग्राम दैवत इमामकासीम, हुसनबाशा आणि अली अब्बास समोरील आलाब कट्ट्यावर वृक्षारोपण

अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : बोरगावचे ग्रामदैवत, इमामकासीम, हुसनबाशा आणि अली अब्बास या दैवतांच्या समोरील आलाब कट्ट्यावरील अनेक वर्षांपूर्वीचे लिंबाचे झाड वाळवी लागून सुकल्यामुळे आणि कट्ट्याची पडझड झाल्यामुळे सदर पवित्र कट्ट्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. या कट्ट्यावर नव्या लिंबाच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. अनेक वर्षांपासून बोरगावकरांची श्रद्धा असलेला हा कट्टा लवकरच सुशोभित होईल. आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर या कट्ट्याचे सुशोभीकरण सुरु आहे.

 

वृक्षारोपण प्रसंगी सरपंच विलासराव सुरवसे, ज्यांच्या पुढाकाराने हे काम सुरु आहे ते परिवर्तन आघाडी चे शिल्पकार मदार जमादार, आधारस्तंभ राजाभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महंमद पठाण,हुसेन शेख, चांद दिवटे, इस्माईल मकानदार,जाफर सलगरे,शिराज बागवान, बाबू अत्तार, खादर मकानदार, महेश हत्तरके, आलम मकानदार, मकसूद तालिकोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

tree-plantation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here