माहिती अधिकारात कोल्हापूर महानगरपालिका शहर अभियंता यांना दहा दिवसात माहिती देण्याचे आदेश

कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर अमरनाथ शेणेकर) : कोल्हापूर महानगरपालिका शहर अभियंता यांनी चार विभागीच वार्ड आफिस उप अभियंता यांना माहिती अधिकार अधिनियम कलम ४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील माहिती दहा दिवसांत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना काळात अधिकार्‍यावरील निश्चत जबाबदारी लक्षात घेता संबधीतच्या माहिती अधिकार अधिनियम२००५ कलम ४ मधील सार्वजनिक प्राधिकरणांना स्वतः होऊन माहिती खुली करण्याचे कायदेशीर बंधन १५ जून२००५ रोजी कायदा अंशतः प्ररित केला त्यावेळी सर्व कार्यलयन माहिती सूचिबद्ध करून ठेवणे अपेक्षित होते म्हणजे आज १६ वर्षे झाली पण माहिती कुठही कार्यालयात नागरिकांची सनद किंवा माहिती पुस्तकाच्या स्वरूपात वरील कार्यालयात दिसून येत नाही.

भ्रष्टचार विरोधी जनजागृती समिती व माहिती अधिकार कार्यकर्ती महासंघ यांच्या वतीने विचारण्यात आलेली माहिती प्राप्त न झालेने पहिले अपिल करणे भाग पडले असता सुनावणीच्या दरम्यान शहर अभियंता यांनी संबधी चार वार्ड कार्यालयच्या जन माहितीअधिकारी यांना ८/७/२०२१ रोजी पुढील दहा दिवसांत माहिती देण्याचे क्र. अपील( प्रथम)३८/२०२१ ने लेखी स्वरूपात दिले. त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनजाग्रती समितीचे कोल्हापूर शहरउपाध्यक्ष अनुक्रमे १) विनायक वाळवेकर २) डॉ.नामदेव निट्टूरकर ३) किशोर माने तसेच अर्धन्यायिक प्रकरणातील सहय्यक प्रतिनिधी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा अध्यक्ष, भ्रष्टचार विरोधी जनजागृती समितीचे शहर अध्यक्ष अमरनाथ शेणेकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here