मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे मैदानात

अमित ठाकरेंच्या हस्ते जोगेश्वरी (पूर्व) येथे मनसे शाखांचे उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी संतोष जाधव) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते ११ जुलै रोजी मुंबईतील जोगेश्वरी( पूर्व) येथे विधानसभा मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते ७२,७३,७८ व ३ या शाखांचे उद्घाटन व गड क्र.७७ ला सदिच्छ भेट दिली तसेच जोगेश्वरी (पूर्व) मनसे उपाध्यक्ष प्रविण मर्गज व जोगेश्वरी (पूर्व) विभागाचे विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले व सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातुन हा कार्यक्रम करण्यात आला.

amit-thakare-1
अमित ठाकरे यांच्या येण्याने जोगेश्वरीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसुन येत होता.त्यातुनच जोगेश्वरीत येणार्‍या काळात मनसे चांगलीच भरारी घेईल अस मत विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले यांनी व्यक्त केले. तसेच तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here