चंद्रकांतदादा पाटील यांची मनेर मस्जिद मोफत ऑक्सिजन सेवेस भेट

कोल्हापूर (महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश चव्हाण) : आज चंद्रकांतदादा पाटील भाजपा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी मनेर मस्जिद कोल्हापूर येथे कोरोना संसर्गाने पीडित रुग्णांसाठी पुरवत असलेल्या मोफत ऑक्सीजन सेवेस भेट दिली.

गेले कित्येक महिने सुरू असलेल्या कार्यास दादांनी खूप छान उपक्रम असे संबोधले. कोरोना काळात मुस्लिम समाजाने फार मोठी मदत केली आहे. अशीच मदत पुढे ही होत राहील अशी आशा दादांनी व्यक्त केली.

chandrkant-patil-at-maner-masque-kolhapur

यावेळी हिदायत मनेर यांच्यासोबत मस्जिद मधील सर्वच मुस्लिम बांधवांचे दादांनी कौतुक केले. यावेळी राहूल चिकोडे, मुस्लिम बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here