ठाणे येथे कलावंतांना स्टीमर, सॅनिटायझर, फेसशिल्ड, मास्कचे वाटप

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : सोमवार दिनांक 12 /07/2021 रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन, भाजपा चित्रपट आघाडी,महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने खोपट ठाणे येथील भाजप कार्यालयात टीव्ही सिरीयल कलाकार, नाटक कलाकार, या सर्वांसाठी कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता अति दक्षता म्हणून त्यांच्यासाठी स्टीमर, सॅनिटायझर, फेसशिल्ड, मास्क, हॅण्डग्लोज इत्यादी वस्तू कोरोना टाळण्यासाठी वाटप करण्यात आले.

यावेळी कोकण पदवीधर आमदार माननीय श्री निरंजन डावखरे साहेब तसेच संदीप लेले साहेब तसेच चित्रपट आघाडीचे उल्हास तावडे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश बनसोडे साहेब चित्रपट आघाडी महिला ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुषमा ठाकूर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन महिला ठाणे अध्यक्ष सौ तृप्ती पाटील ठाणे शहर अध्यक्ष सौ.नताशा सोनकर, सौ.राधा शर्मा, सौ. विद्या शिंदे, सौ. तृप्ती सुर्वे व चित्रपट आघाडीचे इतर पदाधिकारी इत्यादींच्या उपस्थित पडद्यामागील व पडद्यावरील कलाकारांना ही मदत वाटप करण्यात आली.

thane-police-boys

thane-bjp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here