हातकणंगले (तालुका क्राईम रिपोर्टर नंदकुमार वंजीरे) : मंगळवारी बिद्री येथील श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कोरोना रुग्णांना तसेच भविष्यात सुद्धा लागणारी गरज ओळखून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
वैद्यकीय तंज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संपुर्ण तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा सक्षम करण्यासाठी जूलै अखेर 11 प्रकल्प कार्यान्वित होत असून यामधून 27 टन ऑक्सिजनची उपलब्धता होणार आहे.

शासनाच्या आवाहनानुसार बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे आव्हान पेलले आहे. सहकारी क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम ऑक्सिजन प्रकल्प उभारुन बिद्रीने कारखान्याने पुण्याईचे काम केले आहे. या प्रकल्पातून दररोज ९० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे.
यावेळी, कार्यक्रम अध्यक्ष माजी चेअरमन दिनकरावजी जाधव साहेब, चेअरमन के.पी. पाटील,ए.वाय.पाटील, व्हा. चेअरमन विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रविणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रविणसिंह भोसले, श्रीपती पाटील, युवराज वारके, विकास पाटील, एकनाथ पाटील, मधुअण्णा देसाई, जगदीश पाटील, विजयसिंह मोरे, बाळाकाका देसाई, शामराव देसाई, सुरेश नाईक, शशिकांत पाटील-चुयेकर, दिनकर कांबळे, विष्णुपंत कुंभार, सर्जेराव देसाई, बाळासो पाटील आदी उपस्थिती होते.






