जवाहर साखर कारखान्याच्यावतीने वरदविनायक बोट क्लबला यांत्रिक बोट

कोल्हापूर (जिल्हा सहप्रतिनिधी जनार्दन चव्हाण) : इचलकरंजी येथील वरदविनायक बोट क्लबने महापूराच्या काळात सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात दिला आहे. भाट मास्तर यांच्यासोबत त्यांच्या सहकार्‍यांनी या बोट क्लबच्या माध्यमातून कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करुन अनेकांचे प्राण वाचविले आहेत. तेच काम जलदगतीने व्हावे या उद्देशाने जवाहर साखर कारखान्याच्यावतीने यांत्रिक बोट या बोट क्लबला देण्यात आली आहे, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी यावेळी सांगितले.

तसेच इचलकरंजीचा कबड्डी आणि खो-खो बरोबरच रोईंग क्रीडा प्रकारातही नांवलौकिक होत आहे. शहरातील अनेक खेळाडूंनी यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारली आहे. वरदविनायक बोट क्लबच्या माध्यमातून इचलकरंजी रोईंग क्लबने हा नांवलौकिक असाच उंचावत न्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बोट असोशिएशनचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिली. आज वरदविनायक बोट क्लबकडे जवळपास 40 बोट असून इतक्या मोठ्या प्रमाणात बोटी असणारे इचलकरंजी एकमात्र शहर असेल. रोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी सराव करुन इचलकरंजीचे नांव अधिकाधिक उंचवावे. त्यासाठी त्यांना लागेल ती मदत दिली जाईल. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या खेळाडूस 1 लाख रुपये, रौप्यपदक जिंकणार्‍यास 75 हजार रुपये तर कास्यपदक विजेत्यास 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असेही आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी यावेळी जाहीर केले.

varadvinayak-boat-club

boat-club

यावेळी प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, बाळासाहेब जांभळे, संजय आरेकर, पै. अमृत भोसले, गणेश बरगाले, शशिकांत नेजे, संजय बेडक्याळे, तानाजी कोकितकर, नगरपरिषदेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख संजय कांबळे, डॉ. माळी, गजानन चव्हाण, रमेश सातपुते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here