टी सिरीज म्युझिक कंपनीचे एमडी भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून टी सिरीज म्युझिक कंपनीचे एमडी भूषण कुमार यांनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी नेवून बलात्कार केला. २०१७ पासून ते २०२० पर्यंत असे तीन वर्षे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याची तक्रार एका मॉडेलने केली आहे. याप्रकरणी मुंबईतील डीएननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यापूर्वी ‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून मॉडेल मरीना कुंवर हिने भूषण कुमार यांच्‍यावर शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्‍यांनी सर्व आरोप फेटाळले होते.

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात भूषण कुमार व त्यांच्या टीमकडून कोणताही खुलासा केलेला नाही. आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून भूषण यांनी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी नेवून बलात्कार केला. २०१७ पासून ते २०२० पर्यंत असे तीन वर्षे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याचे मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे.मॉडेलच्या तक्रारीवरून डीएननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here