लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी नगरपालिकेकडून विविध कार्यक्रम आयोजित करणांर – उपनगराध्यक्ष तानाजी पोवार

कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त ०१ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद भा.ज.पा, तानाजी पोवार यांनी बुलंद टाइम्सशी बोलतांना दिली.

यात प्रामुख्याने थोरात चौक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करणे, इचलकरंजी नगरपालीकेच्या प्राथमिक, माध्यमिक व मान्यताप्राप्त शाळेमध्ये आण्णाभाऊ साठे यांची समग्र वागमय पुस्तके वाटप करणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा १०१ व्या जयंती निम्मीत शहरामध्ये विविध ठिकाणी १०१ वृक्षारोपण करणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निम्मीत शालेय व माध्यमिक विद्यार्थ्यांची लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजीत करणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निम्मीत शाहू, फुले आंबेडकरांच्या जीवनावर बोलणारे सुप्रसिध्द वक्त्यांचे ऑनलाईन सात दिवसांचे व्याख्यानमाला आयोजीत करणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निम्मीत ९ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी शाहीरी जलसा..पोवाडयाचे ऑनलाईन आयोजीत करावे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निम्मीत नगरपालीकेने इचलकरंजी शहरातील समस्त मातंग समाज्यातील ५००० कुटुंबासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट सांगणारे कॅलेन्डर प्रकाशीत करावे असे निवेदन नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांना शुक्रवार दि.१६ जुलै रोजी उपनगराध्यक्ष दालनात दिले.

ichalkaranji

०१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती असलेने तत्पर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी थोरात चौक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करणेसाठी ही बाब धोरणात्मक असलेमुळे सर्वानुमते निर्णय घेणेसाठी कौन्सिल मंजुरीची आवश्यक असलेने बांधकाम विभागातील नगर अभियंता..संजय बागडे.. यांचेशी फोनवरून संपर्क साधून कौन्सिल मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे आदेश दिले..

तसेच निवेदनाद्वारे दिलेल्या सर्व मागण्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपुर्वी पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. यांवेळी लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे हे साहित्यामध्ये खूप मोठे असे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मराठी साहित्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे. उपेक्षित, दलित, अदिवासी, कष्टकरी समाजाला साहित्यामध्ये प्रतिनिधीत्व देऊन सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे महान कार्य केले आहे.आण्णा भाऊ साठे आमच्यासाठी जिव्हाळयाचे आणि स्वामिमानाचे नेतृत्व आहे.. फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासून ती विकसित करण्याचे कार्य त्यांनी केले आहे, असे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांनी गौरवोद्गार याप्रसंगी काढले.

annabhau-sathe-jayanti-nivedan

यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ.सारिका पाटील तसेच निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात राहूल आवळे, संजय आवळे, हानोक आवळे..सुरज आवळे.. योगेश केंगार..अमोल तडाखे..धीरज आवळे..अक्षय वाघमारे..सतिश आवळे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here