तरुणीची फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबाला अटक

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : प्रेम मिळवण्यासाठी लोक काय काय उपाय करतील सांगता येत नाहि सोडुन गेलाला प्रियकर ह्यास पुन्हा प्रेम करण्यास व लग्न करण्यास काळी जादुटोना करुन तयार करतो असे सांगुन तरुणीची पसवनुक करणाऱ्या बंगाली बाबाला गुन्हे शाखा कक्ष 2 कडून अटक करण्यात आली आहे

खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे वय असलेली मुलगी फेब्रुवारी 2021 तिचे एका मुलासोबतचे प्रेमसंबंध तुटल्याने व त्या मुलाने लग्णास नकार दिल्याने ती अतिशय डिप्रेशनमध्ये आली होती. सदर मुलगी ट्रेनने प्रवास करीत असताना तीने एक पोस्टर पाहीले त्यावर ‘प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय पाहीजे असल्यास 9930694360 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा’ असे लिहले होते. सदर मुलिने त्या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो बाबा कबिर खान बंगाली असल्याचे सांगीतले व त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काही पुजाविधी कराव्या लागतील त्यासाठी खर्च होणार आहे असे सांगीतले तसेच सदर मुलीचा प्रियकर तिच्याकडे ओढला जाण्यासाठी व लग्णास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्ण मोडण्यासाठी काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असे सांगुन वेळोवेळी सदर मुलिकडुन पुजा विधिसांठी लागणार खर्च 4,57,000/- रु घेतले. 4,57,000/- रु इतके पैसे खर्च करुन देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर मुलिने बाबा कबिर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागीतले व पोलीसांकडे तक्रार देईन असे सांगीतले

त्यावर बाबा बंगाली याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळा जादु करुन अपघात घडवुन आणेन व तुला नष्ट करेन असे धमकावल्याने सदर मुलिने खारघर पोलीस ठाणे, नवी मुंबई, गु.रजी. क्र. 233/2021 भा.दं.वि. कलम 420,417,506,507 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणी अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम 2013 कलम 3 अन्वये दि. 01/07/2021 रोजी गुन्हा नोंद केला होता.

सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रवीण पाटील, यांनी आदेशीत केले होते. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 02 उप निरिक्षक गोरे करीत असताना आरोपीचे वेगवेगळे गुगुल पे क्रमांक, बँक अकाउंट क्रमांक ची माहीती घेतली तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सी.डी.आर. विश्लेषण केले.

सदर आरोपीबाबत गुन्हे शाखा कक्ष-02 चे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी दि.11/07/2021 रोजी गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे येथे येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी तात्काळ पोलिस पथक पाठवुन आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली वय 33 वर्षे, रा. रुम नं. 102, समर्थ अपार्टमेंट, गोविंदनगर, मिरा रोड मुळ रा. रुम नं. 222, लिसाळी रोड, मेरठ सिटी, जिला- मेरठ, राज्य- उत्तर प्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले असता आरोपिने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच आरोपीचे मोबाईलच्या गुगल पे अकाउंटवर पिडीत मुलीने पाठविलेल्या पैशांच्या एंट्री देखील आहेत.

सदरच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस कधिही फिर्यादी यांनी प्रत्यक्षात पाहिलेले नसताना, तो कसा दिसतो याचेबाबत खात्री नसताना देखील गुन्हे शाखा कक्ष 02 चे पथकाने अथक परिश्रम करुन आरोपिचे मोबाईल क्रमांक, बँक अकाउंट, बातमिदारांकडुन माहीती प्राप्त करुन कौशल्यपुर्णरित्या सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणेलला आहे. आरोपीस पुढिल तपासकामी खारघर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, इंद्रजीत कानू, रुपेश पाटील, दीपक डोंगरे, यांनी केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here