साईनगरीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; दोन्ही टप्प्यांत रक्तदात्यांची शंभरी पार : विविध संघटनांचा सहभाग

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : येथे १५ जुलै रोजी साईनाथ रक्तपेढी रक्तदान शिबिराचे साई संस्थान ब्लड बँक शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. साईबाबांच्या नगरीत दुसऱ्या शिबीरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन्ही शिबीरात एकुण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून साईबाबांच्या रूग्णसेवेच्या कार्यात योगदान दिले.

लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमीत्ताने साईनगरीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात साईबाबा संस्थान, पोलीस उपअधिक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (शिर्डी विमानतळ), श्रीराम प्रतिष्ठाण, श्रीरामनगर, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, वाहतुक शाखेचे निरीक्षक नारायण न्याहाळदे, शिर्डी विमानतळावरील सीआयएसएफचे उपकमांडट दिनेश दहीवाडकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड, साईमंदीर सुरक्षा प्रमुख आण्णासाहेब परदेशी, उपनिरीक्षक अशोक लाड, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोंदकर, राम पवार, भारतीय जैन संघटनेचे नरेश पारख, कमलेश लोढा, निलेश गंगवाल, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, राजेंद्र गोंदकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, पत्रकार तुषार महाजन आदींनी रक्तदान घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे व साईमंदीर प्रमुख रमेशराव चौधरी यांनी रक्तदान करून शिबीराचा श्रीगणेशा केला.

यावेळी प्रांताधिकारी शिंदे, तहसिलदार हिरे, रक्तपेढीच्या डॉ. मैथिली पितांबरे यांची उपस्थित होती. साईनगरीतील रक्तदाते – महसुल-कामगार तलाठी रमेश झेंडे, अपर्णा शिलावंत, भाऊपाटील जाधव, सुर्यकांत खोजे, योगेश पालवे, हेमंत पंधारे. पोलीस-प्रविण लोखंडे, अमोल गंगलवाड, रविंंद्र साठे, राहुल डोके, अनिल चव्हाण, सुभाष थोरात. सीआयएसएफ, शिर्डी विमानतळ-सचिन वर्मा, अजित पुरोहित, प्रमोद गेवराई, संजय औटी, उमेश बेडरकर, शेख तौसिफ, रोहीदास कोळी. साईसंस्थान-रमेशराव चौधरी, सुरेश पवार, सुभाष घोडे, पोपट फरगडे, क्रिकेटर साईराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते-रविंद्र गोंदकर, कल्पना न्याहाळदे, वृषभ काळे, सोन्याबापु आग्रे, संतोष शेळके, तुषार काळोखे, शुभम काळोखे, आकाश शिंदे, प्रदीप भालके, कृष्णा वाघे, गणेश गमे, महेंद्र डांगे, सुहास गवंडी, गौरव सहदेव आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाहतुक पोलीस शाखेचे निरीक्षक नारायण न्याहाळदे हे काही तांत्रिक कारणाने रक्त देवू शकले नाही हे समजताच त्यांची पत्नी कल्पना न्याहाळदे यांनी रक्तपेढीत येवुन रक्तदान करून पतीची उणीव भरून काढली.

साईसंस्थानच्या साईनाथ रक्तपेढीचे परिश्रमार्थी डॉ. सुर्यकांत पाटील, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. भारत धोका, डॉ. सोनाली घोडके, मिलींदा आराक, चंद्रकांत लुटे, विठ्ठल शिरसाठ, विजया राऊत, सागर भगत, सविता मानकर, अलिया शेख, सुनिता वाघमारे, माया खंडीझोड, ज्योती गोसावी, गोरक्षनाथ नवले, अमोल देवकर, सुनील गागरे, सचिन सापते, लक्ष्मण धुमसे, पत्रकार प्रमोदजी आहेर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here