ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : ठाणे व परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाण्यातील वागळे इस्टेट विभागातील आंबेवाडी येथे घरांमध्ये पाणी शिरले असून, त्यामुळे राहिवाशांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे.
रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाण्यातील वागळे इस्टेट विभाग आंबेवाडी येथे ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक प्रतिनिधीच्या अकार्यक्षमपणामुळे आंबेवाडी परिसरात नाल्या लगतच्या सर्व घरांमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व घराघरांमध्ये पाणी पाणी झाले आहे त्यामुळे सर्व नागरिकांच्या घरच्या वस्तू यांचा भरपूर नुकसान झालेला आहे. सद्यस्थितीत घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना राहण्याचे देखील ठिकाण नाही याची दखल महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी अद्याप घेतलेली नाही सदर परिसरातील रस्त्यांची कामे देखील अपूर्ण असल्यामुळे ह्या अडचणी निर्माण होत असल्याचे, राहिवाश्यांचे म्हणणे आहे.






