कोल्हापूर (जिल्हा सहप्रतिनिधी जनार्दन चव्हाण) : आज कबनुर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडुन ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना प्रादुर्भात कमी करण्यासाठी व कोरोना बाधितांच्या उपचारासाठी कबनुर कोव्हिड सेंटरसाठी 30 oxygen concentrator व Bio pack उपलब्ध करुन मिळावे तसेच 60,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या कबनुर गावात वाढते शहरीकरण व औदयोगिकरण यामुळे गावातील नागरी सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीला अशक्य होत आहे. त्यासाठी गावाअंतर्गत रस्ते, गटारी, पाणीपुरवठासाठी लागणारी वाढीव पाईपलाईन व दिवाबत्तीसाठी साहेबांच्या फंडातुन अतिरिक्त 1 कोटी रूपये फंड मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सैफ भाई मुजावर, तोफिक मुजावर साहेब, सुनिल इंगवले सरकार, गणीभाई मुल्ला,सतीश चव्हाण, , बबनराव इंगळे,राहुल कांबळे दस्तगिर मुजावर , जावेद मुजावर ,अक्षय कांबळे, बाबाजान अपराज उपस्थित होते.






