कळवा येथील घोलाई नगर परिसरात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कळवा येथील घोलाई नगर परिसरात चर्चच्या बाजूला असलेल्या तीन घरांवर सोमवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अचानक दरड कोसळली. याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.

या दुर्घटनेत प्रभू सुदाम यादव (वय ४५ वर्षे), विधावतीदेवी प्रभु यादव (वय ४० वर्षे), रविकिशन यादव (वय १२ वर्षे), सिमरन यादव (वय १० वर्षे), संध्या यादव (वय ३ वर्षे) या पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर प्रीती यादव (वय ०३ वर्षे), अचल यादव (१८ वर्षे) या दोघांना वाचविण्यात टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here