शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात दि. 21 रोजी धुळे ग्रामीणच्या दौऱ्यावर

शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिवसेना धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असुन बुधवार दि. 21 रोजी शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना संलग्न सर्व संघटनांच्या शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, एसटी कामगार सेना, स्थानिय लोकाधिकारी समिती, वाहतुक सेना, शिक्षकसेना व लोकप्रतिनिधी यांची बैठक शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री. बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 21 जुलै 2021 रोजी संपन्न होत आहे.

शिरपूर विधानसभा मतदार संघातील गुजर मंगल कार्यालय, शिरपूर येथे सकाळी ठिक 11.00 वाजता तर शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बिजासनी मंगल कार्यालय, स्टेशन रोड, शिंदखेडा येथे दुपारी ठिक 3.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेसह सर्व संलग्न संघटनेचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी यांनी खालील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here