मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अँप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अँप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
Businessman Raj Kundra has been arrested by the Crime Branch in a case relating to creation of pornographic films & publishing them through some apps. He appears to be the key conspirator. We have sufficient evidence regarding this: Mumbai Police Commissioner pic.twitter.com/LbtBfG4jJc
— ANI (@ANI) July 19, 2021
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अँप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.
#WATCH | Actress Shilpa Shetty's husband & businessman Raj Kundra appeared before the Property Cell of Mumbai Police's Crime Branch, where he was arrested in a case relating to 'creation of pornographic films & publishing them through some apps' pic.twitter.com/mtlM4pYCc3
— ANI (@ANI) July 19, 2021
या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी (१९ जुलै) कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुंद्राला आज (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.






