- नगरपंचायत सत्ताधारी करतात ‘भिक्षेकऱ्यांची पाठराखण’ : कमलाकर कोते
- गुरुवार दि- २२/०७/२०२१ रोजी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात उपोषण : निलेश कोते
शिर्डी (शहर प्रतिनिधी) : शिर्डी नगरपंचायत हद्दीत सध्या हजारो भिक्षेकरी वास्तव्यास असून या भिक्षेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनी व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून या भिक्षेकऱ्यांच्या टोळ्या चालवण्याचे काम गुंड लोक करत आहे. या भिक्षेकऱ्यांना आणून श्री साईबाबा संस्थान च्या इमारतीत वैद्यकीय तपासणी, व्यक्तिगत स्वच्छता,जेवण,चहापाणी,नाष्टा, कपडे याची सुविधा देऊन ठेवण्यात यावे यासाठी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस निरीक्षक, शिर्डी न.पा. , मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व शिर्डी ग्रामस्थांची संयुक्त बैठक साईबाबा संस्थान मिटिंग हॉल मध्ये होऊन या कार्यवाहीसाठी संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे कबूल केले.
विसापूर भिक्षेकरी गृह यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांच्याकडून १६० भिक्षेकऱ्यांची व्यवस्था होऊ शकते असे त्यांनी कळवले. मात्र ही सर्व तयारी असताना शिर्डी नगरपंचायतचे सत्ताधारी हे भिक्षेकऱ्यांची पाठराखण करत आहे. भिक्षेकऱ्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामाध्यमातून शिर्डीत अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे.या भिक्षेकरी मार्फत शिर्डी नगरपंचायतीला काय लाभ मिळतो हा संशोधनाचा विषय असून यामागे नक्कीच गौडबंगाल काय..? असा सवाल शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय.


शिर्डी नगरपंचायतीच्या जेष्ठ नगरसेवकासोबत गैरवर्तन होऊन सुद्धा नगरपंचायत कडून कुठलीही कार्यवाही होत नाही.या भिक्षेकरी टोळ्यांकडून शिर्डी नगरपंचायतीला निश्चित काहीतरी लाभ होत असावा असे आम्हाला वाटते. श्री साईबाबा मंदिराच्या कळस दर्शन,मुख दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना या भिक्षेकऱ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो, पण या गोष्टीशी शिर्डी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांना काही देणे घेणे नाही. याच्या निषेधार्थ शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही गुरुवार दि- २२/०७/२०२१ रोजी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मा.मुख्याधिकारी साहेब यांच्या दालनात उपोषणास बसणार आहोत तरी आम्हाला उपोषणास बसण्यास परवानगी मिळावी अश्या मागणीचं निवेदन नगराध्यक्ष, मुख्यधिकारी,डी.वाए.एस.पी.,पोलिस निरीक्षक, संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलंय. याप्रसंगी कमलाकर कोते,सुधाकर शिंदे,शिवसेना तालुकाध्यक्ष संजय शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी रमेश गोंदकर,शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते,राष्ट्रवादी शहरअध्यक्ष महेंद्र शेळके,राहुल गोंदकर,निलेश कोते,विजय जगताप,संदीप सोनवणे,अमित शेळके,साई कोतकर, अनिल पवार, कीरण माळी उपस्थित होते.






