विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी निवेदनावर सकारात्मक चर्चा; संस्थानकडून आश्वासन – कैलासबापू कोते

शिर्डी (शहर प्रतिनिधी) : कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने जन जीवन विस्कळीत झाले असताना जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला वातावरण निर्माण झाला आहे अश्यातच मुलांची शिक्षणाची काळजी पालकांना लागली आहे आणि सर्व व्यवसाय बंद असल्याने मुलांची फ़ी भरायची कशी हाही एक प्रश्न पालकांना पडलेला आहे. या प्रश्नाची दखल घेत शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी आज संस्था कार्यकारी मंडळाची भेट घेऊन शाळेची संपूर्ण फी माफ करण्याचे निवेदन कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

याप्रसंगी बोलताना कैलास कोते म्हणाले की श्री साईबाबा संस्थानचे शैक्षणिक संकुलात तालुक्यातील गोरग रीब लोकांची मूले शिक्षण घेत आहेत त्यांची आजमितीला आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे जीवन जगावे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे त्यातच मुलांचे शिक्षणासाठी शाळेची फी भरण्यास त्या लोकांकडे पैसे नसल्याने श्री साईबाबा संस्थानाला फी माफ करण्यासाठी निवेदन दिले आहे आणि मला खात्री आहे की संस्थान याबाबत सकारात्मक निर्णय घेईल

निवेदन देतांना त्यांच्यासमवेत अरविंद कोते, दत्तू कोते, मन्सूर शेख, सचिन गायकवाड, नामदेव सला कर, भाऊ भोसले, अरुण चौधरी, फारुक शेख, निलेश रहाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिर्डीतील इतरही खाजगी शाळांनीसुध्दा यावर विचार करावा जेणे करून गोर गरीबांचे मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. यावेळी कार्यकारी अधिकारी यांनी परिसरातील नागरिकाच्या सद्यपरिस्थितीचा विचार करता सकारात्मक नक्कीच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने कैलास बापू कोते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि मुलांच्या पालकांसह कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अरविंद कोते, भाऊसाहेब भोसले, दत्तात्रय कोते, निलेश रहाणे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here