भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

लंडन : भारत – इंग्लड दरम्यान होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधार जो रूटच्या नेतृत्त्वाखाली १७ सदस्यीय संघाची घोषणा नुकतीच केली.

बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन या चार दिग्गज खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. यासोबतच वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसन यालाही संघात स्थान देण्यात आलं असून न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट डेब्यू करणारा ऑली काही वादग्रस्त ट्विट्समुळे निलंबित होता. त्याच्यावर वर्णभेदी आणि महिलांविरोधी ट्विट केल्याचा आरोप होता.

इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या संघात दोन फिरकीपटूंसह पाच वेगवान गोलंदाज सामिल आहेत. इंग्लंड संघाने फेब्रुवारी-मार्चमध्ये भारताचा दौरा केला होता. दरम्यान या संघात इंग्लंडचे महत्त्वाचे खेळाडू जोफ्रा आर्चर आणि क्रिस वॉक्स यांना स्थान दिलं गेलेलं नाही. याचे कारण आर्चर याला नुकतीच दुखापत झाली होती. तर वॉक्सही दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच यष्टीरक्षक बेन फोक्स आणि वेगवान गोलंदाज ऑली स्टोन ही पहिल्या दोन टेस्टसाठी संघात नसतील.

इंग्लंडचा संघ :
जो रूट (कप्तान), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिनसन, हसीब हमीद, डॉम सिबले, डॅन लॉरेंस, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वुड.

टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here