खुलताबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पून्हा फूटली; नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त

खुलताबाद (प्रतिनिधी मूनीर शाह) : आज दिनांक 20 रोजी खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन सुलतानपूर येथे फुटली असून.लाखो हजारो लिटर पाणी वाया गेले आहे, सुलतानपूर येथील नागरिकांनी नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना फोन वरून माहिती दिली असून या ठिकाणी नगरपरिषद कर्मचारी पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी येणार आहेत

तीन दिवसापूर्वी येथे हीच पाईपलाईन फुटली होती त्या दिवशीही हजारो लिटर पाणी वाया गेले होते तर पून्हा ही पाईपलाईन नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला होता त्यात आज पुन्हा पाईपलाईन. वेटींग वरच असलयाने नागरिकांतून तीव्र नाराजी पाहण्यास.मिळत आहे

पाईपलाईन वारंवार फुटल्याने खुलताबाद शहराच्या पाणीपुरवठा वर परिणाम होईल, ही पाईपलाईन अत्यंत जीर्ण झाली असून नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी नगरपरिषदेने प्रस्ताव पाठवला असून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here