बिकिनी न घातल्यावरून नॉर्वेच्या महिला संघाला केला दंड

नवी दिल्ली : नॉर्वेच्या महिला खेलाडूंनी बुल्गारिया येथे आयोजित युरोपियन बीच हॅडबॉल चॅम्पियनशिपध्ये कांस्य पदकाच्या स्पेनविरुद्धच्या लढतीत बिकीनी बॉटम्सच्या जागी शॉर्ट्स घातले होते. हॅण्डबॉल खेळतांना महिला संघासाठी नियोजित केलेली बिकिनी खेळाडूंनी न घातल्याबद्दल त्यांना दंड करण्यात आला आहे. या वृत्ताला युरोपीय हॅडबॉल फेडरेशनने दुजोरा दिला आहे.

फेडरेशनच्या नियमानुसार नॉर्वेच्या महिला खेळाडूंनी या सामन्यात बिकिनी बॉटम्स घातले होते. यावरून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. या करावाईनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी जोरदार टीका केली. या नियमावर अनेकांनी फेडरेशनवर हल्ला चढवला आहे.

युरोपीय हॅडबॉल फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार अनुचित कपडे घातल्याबद्दल महिला संघाला एकूण १ हजार ७०० डॉलरचा दंड करण्यात आला आहे. नॉर्वेच्या प्रत्येक महिला खेळाडूला १७७ डॉलर दंड द्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here