महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधील कार्यालयांवर धाड
नवी दिल्ली : कर चोरी प्रकरणात दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे.
Madhya Pradesh: Visuals from outside the office of Dainik Bhaskar Group in Bhopal
Income Tax Department is conducting searches on Dainik Bhaskar Group in connection with tax evasion case, at multiple locations, as per Sources pic.twitter.com/boH3xLGUUE
— ANI (@ANI) July 22, 2021
यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे. कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






