कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी तिघांना जन्मठेप; गणेश मारणेसह १२ जणांची निर्दोष मुक्तता

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पौड फाटा येथे कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा निर्घृण खुन केल्याप्रकरणी मोका विशेष न्यायालयाने सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारुसह १३ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन.सिरसीकर यांनी हा निकाल दिला आहे.

सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबुब शेख आणि संतोष रामचंद्र लांडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यात एकूण १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या दरम्यान यातील पांडुरंग मोहोळ आणि दिनेश आवजी यांचा मृत्यु झाला होता. गणेश मारणे, संजय कानगुडे, समीर ऊर्फ सम्या शेख, सचिन मारणे, राहुल तारु, अनिल खिलारे, विजय कानगुडे, शरद विटकर, निलेश माझीरे, राहुल शेख अशी निर्दोष मुक्तता झालेल्याची नावे आहेत.

या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना संदीप मोहोळ यांची बहिण साधना मोहोळ यांनी सांगितले की, आम्हाला सर्व आरोपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तिघा जणांना शिक्षा झाली. तब्बल १४ वर्षानंतरही न्याय मिळाला तरी तो अपूर्ण आहे असे वाटते.

दरम्यान, मोहोळच्या खुनातील दोन आरोपींनी न्यायालयाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दुकानदाराला मारहाण करून पैसे न दिल्यास तुरुंगात राहून ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अनिल वाघू खिलारे (वय ४६) व सागर वाघू खिलारे (४२, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here