राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना २५ लाखांची लाच दिल्याचा दावा; एसीबीला आलेल्या आरोपी यश ठाकूरच्या ईमेलने खळबळ

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचे आरोप केले आहेत. पॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. कुंद्रा यांना गुरुवारी दुपारी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे. राज कुंद्रा सध्या २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे.



राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांना बरेच महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. मात्र, पोलीस अद्याप तपास करत आहेत. मुंबई पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्राच नव्हे तर इतरही अनेक लोक पोर्न इंडस्ट्रीत सहभागी होते. पोलिसांच्या चौकशीत अशी अनेक नावे समोर आली आहेत, ज्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.

दरम्यान एसीबीला आलेल्या ईमेलने चांगलीच खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये यश ठाकूरने म्हटले आहे की, पोलिसांनीही माझ्याकडूनही लाच मागितली होती. यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ईमेल लिहून तक्रार केली होती, तसेच मला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. यश ठाकूर यांच्याविरूद्ध पॉर्न फिल्म प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनविण्यात आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात गुंतला होता. या ते कामातून लाखो कोटी रुपये कमवायचे. या अ‍ॅपचे नाव हॉटशॉट्स अ‍ॅप आहे. ज्यावर अश्लील चित्रपट पोस्ट केले गेले. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपदेखील तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये दररोजच्या कमाई व तोट्याता हिशोब ठेवला जात असे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here