गुरुवारी रात्री ९ पासून मुंबईची जीवनवाहिनी सुरु

तब्बल २३ तासांनंतर सीएसएमटी ते कसारा लोकल धावली

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचा बळी गेले. तसेच मुंबई आणि परिसर जलमय झाले. याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर झाला. मात्र परवापासून मुंबई आणि ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे रुळ आणि अनेक रेल्वे स्थानकात तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर तब्बल २३ तासांनंतर सीएसएमटी ते कसारा ही लोकल धावली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कसारा/कर्जत लोकलसेवा गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून पूर्ववत करण्यात आली आहे.

सध्या सीएसएमटी ते खोपोली आणि मुंबई-पुणे घाटमार्ग बंद आहे. हा घाटमार्ग रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here