बाजार सावंगी येथील वन कार्यालय रामभरोसे

असून अडचण नसून खोळंबा अशी गत या कार्यालयाची झाले आहे

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) : खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बाजार सावंगी येथील वन बीट कार्यालय हे.रामभरोसे या कार्यालयाची गत असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे बाजार सावंगी येथील वन बीट कार्यालयाचे नाव बदलून राम भरोसे वन कार्यालय नाव देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वन विभागाचे हे कार्यालय नेहमी कुलूप बंद राहत असल्यामुळे व या कार्यालयाकडे वनविभागातील एकही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकतही नाही वनविभाग प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून बाजार सावंगी येथे वन बीट कार्यालय उभारलेआहे परंतु हे कार्यालय शोभेची वस्तू म्हणून दिसून येत आहे या कार्यालयाकडे एकही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकत नसल्याने हे कार्यालय कित्येक वर्षापासून धूळखात पडून आहे या वन विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील जंगलातील डोंगरातील झाडांची बिनधास्तपणे सर्रास कत्तल सुरू आहे.

बाजार सावंगी येथील खुलताबाद येथील वन परिक्षेत्र अधिकारी( RFO) चौकीदार. फोरेस्टर .यांच्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांचा कुठल्याही प्रकारचा वचक नसल्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी पैशाची देवाणघेवाण करत वन विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध कामाकडे लक्ष देत नाहीत वनविभागातील वरिष्ठांनी लवकरात लवकर लक्ष देऊन येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी दुसरे कर्मचारी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी बाजार सावंगी व परिसरातील नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here