अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : आज मौजे बोरगाव देशमुख येथे इदुल अजहा(बकरी ईद)निमित्त राजेबकसार पंच कमिटी व ड्रायव्हर ग्रुप बोरगाव यांच्या वतीने ग्रामदैवत राजेबकसार दर्गा परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा सामना करत असताना ऑक्सिजनचे महत्त्व काय आहे याची जाणीव संपुर्ण जगाला झाली आहे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे परदेशातुन ऑक्सिजन मागवण्याची वेळ देशावर आली होती.हेच गांभीर्य डोळ्यासमोर ठेऊन बोरगाव देशमुख येथील युवकांनी उदात्त हेतूने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविले आहे.


या वृक्षारोपणासाठी वृक्षरोप हे पुण्याहून हुसेन शेख व यासीन शेख(टेलर)यांनी उपलब्ध करून दिले असुन वृक्षारोपणसाठी पंच कमिटीचे मौलाली पठाण, नवाज पठाण, शौकतली मुजावर,मकतुम मुजावर,खादर मकानदार, मदार मुजावर, अल्लाबक्ष मुजावर,ड्रायव्हर ग्रुपचे चांद दिवटे, नूर बागवान, मुबीन पटेल, सैपन दिवटे,इसाम मुरूमकर,महिबुब ताशेवाले,रज्जोद्दीन मुजावर,शाबीर पठाण,आसिफ मुजावर, युसुफ खडकाळे, जावेद मुजावर, बाशा मुजावर,महिबुब पठाण,आमीर सलगरे,काशीनाथ कलशेट्टी,मुजीब मुजावर मोहसीन पठाण आदी युवक उपस्थित होते…






