वाटेगावच्या धर्तीवर लोकशाहीर,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार – उपनगराध्यक्ष तानाजी पोवार

कोल्हापूर (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान होते. कला,पोवाडा,साहित्य अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ दिले.ते थोर साहित्यीक होते.त्यांचे कार्य व्यापक होते.अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट २०२१ रोजी १०१ वी जयंती आहे.

त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा आणि आण्णाभाऊ साठे यांच्या भव्य कार्याचा आदर्श नव्या पिढीपुढे रहावा,या उदात्त भावनेतून त्यांचा पूर्णाकृती पुतळा महात्मा गांधी हौसिंग सोसायटीच्या प्रांगणात बसवण्यात यावा.याशिवाय, अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे आहे. त्याठिकाणी आदर्श स्मृतीस्थळ बनवले आहे..

तसेच अण्णाभाऊ साठे यांचा वारणा खोऱ्यासह मुंबईत मोठा संपर्क होता. त्यांचे कर्तृत्व मुंबईत घडले.या सगळ्या घटनांचा खोलवर अभ्यास करून महात्मा गांधी सोसायटी परिसरात अण्णाभाऊंच्या विचारांचे सर्वव्यापी सामाजिक स्मारक उभे रहावे यासाठी “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सामाजिक विचार कृती अभ्यास समिती” ची तत्काळ स्थापना इचलकरंजी पालिकेतर्फे केली जावी.

tanaji-powar-meeting

वाटेगाव येथे आण्णाभाऊ यांच्या जीवनकार्यावर आधारित तैलचित्रे व कादंबऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.भव्य सभागृह आहे. इचलकरंजी पालिकेने या सगळ्या बाजूंचा सखोल विचार करून स्वतंत्र भव्य ग्रंथालय व वाचनालय, समाजवादी प्रबोधनीच्या धर्तीवर स्वतंत्र सभा व्यासपीठ, मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी महत्वाच्या घटनांचा या कामात अंतर्भाव करावा,त्यासाठी स्वतंत्र कृती समिती स्थापन करावी. त्याचा सर्व खर्च दलित वस्ती सुधार योजना निधीतून केला जावा अशा विविध मागण्यांबाबतचे निवेदन मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी या अनुषंगाने शुक्रवार दि.२३ जुलै रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांना उपनगराध्यक्ष दालनात आयोजित बैठकीत दिले.

सदर बैठकीत मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी मागणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.यामधील वाटेगावच्या धर्तीवर स्मारक उभारणे,या प्रमुख मागणीनुसार याकामी मातंग समाजातील जेष्ठ आणि माहितीगार नागरिकांची अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.. तसेच महात्मा गांधी हौसिंग सोसायटी मध्ये आण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी नगरपरिषद पॅनेल वरील आर्किटेक राजीव हुल्ले यांना आदेश देवुन सदर आराखडा अंतिम मंजुरीसाठी येत्या कौन्सिल मध्ये घेणेचा निर्णय घेण्यात आला.

ravi-rajpute-nivedan

त्याचबरोबर या ठिकाणी शहरातील समाजवादी प्रबोनिधी च्या धर्तीवर ग्रंथालय,वाचनालय , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लवकरात लवकर सुरु करणे आणि आण्णाभाऊ साठे यांच्या नातलगांचा इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने नागरी सत्कार करणे बाबतचे महत्वपूर्ण निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आले.

या बैठकीला बांधकाम समिती सभापती. उदयसिंह पाटील.. आरोग्य समिती सभापती. संजय केंगार.. ज्येष्ठ नगरसेवक. मदन झोरे.. कॉ.सदा मलाबादे.. राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका कर्मचारी संघटना..प्रदेशाध्यक्ष.. सुभाष मालपाणी.. नगरपालिका प्रशासनातर्फे कामगार अधिकारी. विजय राजापुरे.. मिळकत पर्यवेक्षक. सचिन पाटील.. तसेच मा.उपनगराध्यक्ष. रवि रजपुते.. यांच्या नेतृत्वाखालील निवेदनपर शिष्टमंडळात…प्रवीणकुमार गायकवाड..राजीव जगताप..लखन हेगडे..संभाजी जगताप..सुरज गेजगे..विलास गायकवाड..प्रभाकर लोखंडे..शंकर जगताप..संदीप जगताप..शशिकांत लोखंडे..रणजीत आवळे..दादू हेगडे..मुरलीधर हेगडे..स्टीफन आवळे..सुनील गेजगे..सौ.सुलक्षणा वाघमारे..राम केंगार..महेश बुचडे..रमेश हेगडे..श्यामा गेजगे..पप्पू लोखंडे..शेखर अवघडे..सुनील भोरे..मारुती लोखंडे..प्रमोद भोसले..सागर केंगार..शामा हेगडे..आकाश हेगडे..तुषार हेगडे..रफीक आवळे..शंकर तडाखे..रमेश दाभाडे..प्रकाश साठे..प्रमोद भोसले..नितीन पाटोळे..लखन हेगडे..गंगाधर लोखंडे..संदेश ढवळे..पप्पू गेजगे..जगदीश माळी..सिकंदर अवघडे..लक्ष्मी गेजगे..मंगल जगताप..प्रकाश जाधव..किरण हेगडे..अर्चना तिवडे..विलास ढवळे..यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here