पुरपरिस्थिती भागांतील नागरिकांसाठी लागेल त्या आवश्यक उपाययोजना तात्काळ करणार
कोल्हापूर (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात संतधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात झालेला पाऊस व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे.२०१९ साला प्रमाणे पूराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, त्यांच्या राहण्याची व इतर सोय करणे,यांसाठी तात्काळ सर्व नगरसेवक व पालिका पदाधिकारी यांची आढावा बैठक घेवून सदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी..
कोल्हापूर जिल्हयात व इचलकरंजी शहरात गेली चार दिवस पावसाची सततधार चालू असलेने पंचगंगा नदीला महापुर येण्याची शक्यता असलेने नदीशेजारील वस्त्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.तरी पुरग्रस्त नागरीकांचे सोईसाठी आम्ही स्वखर्चाने न.प.ची शाळा क्र. 6 व रिक्रएशन हॉल येथे छावणी सुरु करणार आहे. तरी सदर ठिकाणी पुरग्रस्त नागरीकांसाठी छावणी सुरु करणेस परवानगी मिळावी, असे निवेदन शुक्रवारी दि.२३ जुलै रोजी ज्येष्ठ नगरसेवक राहूल खंजिरे यांनी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांना उपनगराध्यक्ष दालनात दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी पुरस्थिती नियंत्रणासाठी इचलकरंजी नगरपालिका प्रशासनातर्फे सर्व यंत्रणा तयार असून पुरस्थितीची पाहणी करून नागरिकांसाठी आवश्यक ज्या लागेल त्या उपाययोजना तात्काळ पूर्ण करु, असे आश्वासन तसेच शाळा क्र. 6 व रिक्रएशन हॉल येथे छावणी सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, भा.ज.पा.युवा मोर्चा इचलकरंजी शहर प्रमोद बचाटे, भा.ज.पा.विणकर आघाडी शहराध्यक्ष म्हाळसाकांत कवडे उपस्थित होते.






