शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक हा अन्याय आणि अत्याचार विरुध्द लढणारे ठराविक मावळे आहेत. छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन बाळासाहेबांच्या विचारांनी पेटलेली माणसे आहोत. बाळासाहेबांनी आपणा सर्वांच्या मनात विचारांची ठिणगी पेटवलेली आहे. चांगल्या आचारणाची, चांगल्या विचारांची माणसे सोबत घेऊन त्या ठिणगीला प्रज्वलित करायचे आहे. ती प्रज्वलित झाल्यास शिंदखेड्यात भगवी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी येथे व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने बुधवार दि.21 रोजी शिंदखेडा तालुक्यात बिजासनी मंगल कार्यालय येथे शिवसंपर्क अभियानाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हायुवाधिकारी ॲड.पंकज गोरे, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, दोंडाईचा उपजिल्हासंघटक कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, शहरप्रमुख संतोष देसले, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, युवासेना दोंडाईचा तालुकाप्रमुख आकाश कोळी, युवतीसेनेच्या शिवानी पवार, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका ज्योती दिनेश पाटील, तालुका संघटिका ज्योतीताई पाटील, स्थानीय लोकाधिकारी समितीचे जिल्हाध्यक्ष हिरालाल बोरसे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.थोरात पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे कुटूंब असुन राज्याचे कुटूंबप्रमुख मुख्यमंत्री आहेत. कोरोना काळात सामान्य माणसाची लाखमोलाची संपत्ती म्हणजे त्याचे कुटूंब. आणि याच कुटूंबाची काळजी करण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी आपल्या गावातील सवंगड्यांना सोबत घेऊन गावात किती लसीकरण झाले आहे, किती लोकांचे लसीकरण करणे बाकी आहे? लसीकरण करण्यात काही अडचण येत आहे का? ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला, त्यांना दुसरा डोस मिळाला का? याबाबत विचारपुस करा. अडचणीच्या काळात मदत केल्यास त्या कुटूंबाला एक आधार वाटेल. यामुळे ते कुटूंब शिवसेनेशी जोडले जाईल. शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात पोहचविण्याचे काम खऱ्या अर्थाने करतो आहे, असे म्हणत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत श्री.थोरात म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सध्या दोन वायरस असून एक कोरोना तर दुसरा भाजप स्वत:च कोरोना आहे. जास्तीत जास्त लसीकरणाच्या माध्यमातून पहिल्या कोरोनावर मात केल्यास दुसरा कोरोना आपोआप संपुष्टात येईल, असेही श्री.थोरात म्हणाले.

यानंतर जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक गाव पातळीपर्यंत जाऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गावातील कर्ते लोक गेली. दुसऱ्या लाटेत प्रचंड मोठे नुकसान झाले. लोकांना अन्नधान्यपासून ते दवाखान्यात अनेक आर्थिक संकटे आली. मात्र, या संकटाच्या काळात स्वत:ला राजे म्हणविणारे, माजी मंत्री, शिंदखेडा तालुक्याचे आमदार यांनी कोणत्या गावात पाहणी केली? कोणत्या गावात भेटी दिल्या? नागरिकांना रेमडिसीवीर, ऑक्सीजन, बेड, इंजेक्शन या गोष्टीची आवश्यक्ता होती तेव्हा आमदार साहेब कुठे होते? त्यांनी काय केले? असे गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेना व पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी मांडला.
याप्रसंगी माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हायुवाधिकारी ॲड.पंकज गोरे, जिल्हासंघटक मंगेश पवार, महानगरप्रमुख मनोज मोरे यांनीही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी छोटु पाटील, नरडाण्याचे दिनेश पाटील, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, दोंडाईचा शहर संघटक राजेश रुपचंदाणी, एसटी कामगार सेनेचे आर.आर.पाटील, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, अक्कडसेचे सरपंच रावसाहेब सैंदाणे, परमेश्वर वाल्हे, किरण गिरासे, शोएब शेख, संदीप साळुंके, संजय पाटील, नितीन लोटन माळी, राजेंद्र भट पवार, सुदाम नाना येडवे, राजेंद्र गोरख माळी, संतोष नामदेव माळी, महावीर भागचंद जैन, अशोक गोपीचंद मराठे, गणेश पाटील-भदाणे, कल्याण पाटील, सतिष यशवंत पाटील, पंडीतराव भिमराव पवार, भूषण सोनवणे, राहुल देविदास पाटील, कपिल हिरामण चौधरी, नंदलाल पाटील, दिपक बोरसे, रुपेश नागो खंडारे, कैलास पाटील, सुरेश सिसोदे, समाधान पाटील, मच्छिंद्र पाटील, हिरालाल पाटील, वासुदेव शिंदे, जगदीश पाटील, पांडूरंग माळी, योगेश वाघ, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बबलू प्रभाकर पवार, हितेंद्र निकम, विजय पाटील यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, युवतीसेना, एसटी कामगार सेना, स्थानिय लोकाधिकारी समिती, वाहतुक सेना, शिक्षक सेना आदी संलग्न संघटनेचे शिवसैनिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन तालुका समन्वयक विनायक पवार यांनी केले.






