रायगड (प्रतिनिधी विनया मेढेकर) : महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही अनेकांच्या आप्तस्वकीय बेपत्ता असून, कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.
#MahadLandslide
🔸Raigad Dt adm,Maha reptd 🔸Landslide at Vill Taliye
🔸Arnd 32 houses buried 🔸72-76 pers feared trapped
🔸Under heavy debris
🔸Of mountainside
🔸@5Ndrf team on site
🔸32 bodies so far
🔸Toll May rise
🔸Slides elsewhere too@HMOIndia @PIBMumbai @ANI @NDRFHQ pic.twitter.com/AUjOskESsw— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) July 23, 2021
अद्यापही ५२ लोकांचा शोध सुरू असून, युद्धपातळीवर कार्य केलं जात आहे. तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज (२४ जुलै) घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशीही संवाद साधला. तळीयेच्या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील ५२ जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला, १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता आहेत, असं त्या म्हणाल्या.
मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. तसंच गावकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून, तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधतील. नंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.






