मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावातील घटनास्थळावर दाखल

महाड (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात पोहोचले. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. तळीये गावात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यांनी तळीये गावात दरड दुर्घटनेची पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांसोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here