राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे शिष्टमंडळाने घेतली सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना गुरुवारी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे शिष्टमंडळ जाऊन भेटले. त्यांनी विविध विषयांवर सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करताना कलावंत व सांस्कृतिक – चित्रपटाच्या समस्यादेखील मांडल्यात.

यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा देण्याबाबत, म्हाडा आणि सिडको मध्ये कलाकारांना पाच टक्के आरक्षित घर मिळण्याबाबत, सगळ्या जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंत मानधन कमिटी होण्याबाबत ,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कमिटी जाहीर कराव्यात, गेली पाच वर्ष मराठी चित्रपटांना अनुदान मिळाले नाहीत तेसुद्धा लवकर मिळावे ,वृद्ध कलावंत पेन्शन मध्ये जास्तीत जास्त वाढ करावी अशा अनेक विषयांवर सांस्कृतिक मंत्री यांच्या बरोबर चर्चा झाली

चर्चा सकारात्मक झाली आणि लवकरात लवकर पुढील पंधरा दिवसात या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असा शब्द सांस्कृतिक मंत्री यांनी दिला. राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील सोबत अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेत्री सविता मालपेकर ,अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, प्रदेश सचिव मंगेश मोरे ,राज्य समन्वयक संतोष साखरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here