पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले कौतुक, बक्षिस जाहीर
बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील पेट्रोल पंप मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम लंपास केल्याची घटना 19 जुलै सोमवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अशोक गोपिनाथ काकडे हे वेरूळ येथील जय श्री राम सर्वो ईंडीयन ऑईल पेट्रोल पंपाचे मॅनेजर असुन ते 19 जुलै दुपारी ०१.४० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील दोन दिवसाच्या पेट्रोल / डिझेल विक्रीतुन आलेले ०५,३७,००० पैसे वेरुळ येथील स्टेट बँक आँफ ईंडीया शाखा येथे भरण्यासाठी त्यांचा दुचाकीवरून निघाले होते दरम्यान काही अज्ञात व्यक्तीनी त्यांच्या दुचाकीला धडक दिऊन त्यांना खाली पाडण्यात आले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडे असलेले ०५,३७,००० रुपयांची बँग हिसकावुन घेवुन पळ काढला.
या हल्ल्यात पेट्रोलपंप मॅनेजरवर गंभीर जखमी झाले असून या संदर्भात खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, पोलीसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाचे चक्र फिरवून काही तासांतच चार आरोपींना जेरबंद केले आहे. सदरील हल्ला याच पेट्रोल पंपावर काही दिवसांपूर्वी काम करत असलेल्या प्रकाश कल्याण चुंगडे रा.खापरखेडा ता.कन्नड याने केला असल्याची माहिती खुलताबाद पोलिसांनी दिली आहे. १ ) प्रकाश कल्याण चुंगडे वय २१ वर्ष रा.खापरखेडा ता.कन्नड २ ) महेंद्र रामदास साळुंके वय २१ वर्ष रा.मनुर ता.वैजापुर ३ ) नितीन घाशीराम राजपुत वय २१ वर्ष रा.खापरखेडा ता.कन्नड ४ ) अर्जुन मिठु ताटु रा.रुपवाडी पोस्ट सासेगांव ता.कन्नड या चार जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या असुन या आरोपींकडून ३,११,६७० रोख रक्कमेसह दोन मोटार सायकल तीन मोबाईल असा एकुण ३,८६,६७० रुपयेचा ऐवज जप्त केला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे , पोलीस नाईक यतीन कुलकर्णी , भगवान चरावंडे , कारभारी गवळी , सुहास डबीर , पोलीस शिपाई कृष्णा शिंदे , मपोशी रुपाली सोनवणे चालक हेड कॉन्स्टेबल .रामदास दिवेकर , प्रमोद गरड यांनी केली आहे..ही कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खुलताबाद पोलिसांचे कौतुक करून त्यांना बक्षीस.जाहीर केले आहे.






