जागतिक मानांकनातील मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
नवी दिल्ली : टोकियोमध्ये ऑलिंम्पिक सुरु असतांना भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरी येथे सुरु असलेल्या जागतिक कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे.
७३ किलो वजनाच्या महिला गटात हरियाणाच्या भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीमध्ये सुरु असलेल्या जागतिक कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप २०२१मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
#WrestleBudapest WW 73kg medal bouts results
🥇PRIYA 🇮🇳 df Kseniya PATAPOVICH 🇧🇾, 5-0
🥉Lillian FREITAS 🇺🇸 df Bukrenaz SERT 🇹🇷, 4-0
🥉Mariia AKULINCHEVA 🇷🇺 df Veronika NYIKOS 🇭🇺, via fall— United World Wrestling (@wrestling) July 22, 2021
प्रिया मलिकने पटकावलेले पदक हे ऑलिम्पिकमधील नसले तरी रेसलिंगच्या जगतातील एका मोठा स्पर्धेतील आहे. यामुळे या तिच्या कामगिरीचे देखील सर्वा स्तरातून कौतुक होत आहे.






