पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : मुंबई गोवा महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला आहे.भरधाव वेगात असलेल्या ट्रेलर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेण तालुक्यातील गोविर्ले येथे गाड्यांना उडवले. यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात झाल्यानंतर ट्रेलर न थांबवता चालकाने पुढे नेत पुन्हा खारपाडा येथे आणखी काही गाड्यांना उडवले. स्थानिकांनी पाठलाग करून कर्नाळ्यात ट्रेलर अडवून ट्रेलर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.






