उपाध्यक्षपदी कैलास बाविस्कर तालुका कार्यकारिणीत स्थापित
चोपडा (प्रतिनिधी मिलींद वाणी) : सद्या वेब न्युज पोर्टल व यु ट्युब न्यूज चॅनलच्या माध्यमातुन जलदगतीने सर्वप्रकारच्या घडामोडी या सर्वसामान्यांपर्यंत लगेच पोहोचतात.म्हणुन या माध्यमाला सर्वच स्तरातून मागणी होत असून त्याचा प्रचार व प्रसार हा तितक्याच ताकदीने व्हावा व हे माध्यम चालविणारे संपादक व प्रतिनिधी यांना योग्य ती दिशा व सहकार्य मिळावे या भावनेतून वेब मिडीया असोसिएशन मुंबई ची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी अतिशय दुरदृष्टी ठेवत या संघटनेची स्थापना केली आहे.आज रोजी चोपडा येथे वेब मिडीया असोसिएशनची तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आली.यामध्ये तालुका अध्यक्षपदी लतीष जैन,तालुका उपाध्यक्षपदी कैलास बाविस्कर व डाॅ.सतिष भदाणे,तालुका सचिवपदी विश्वास वाडे,तालुका सरचिटणीसपदी महेशा निंबा पाटील व शुभम माळी,तालुका संघटकपदी रविंद्र पाटील ( वडती ) तसेच तालुका सह-संघटकपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
विश्रामगृह येथे कार्यकारीणी गठीत करणेकामी चर्चा करतांना वेब मिडीया असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य…
सदर कार्यकारीणी वेब मिडीया असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजय जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडीया यांनी विभागीय समन्वयक नंदलालभाऊ मराठे,जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरसाठ, जिल्हा संघटक संजीव शिरसाठ ,जिल्हा सचिव कमलेश वानखेडे व अनिलकुमार पालीवाल, जिल्हा सरचिटणीस श्यामकांत जाधव, जिल्हा समन्वयक सचिन जैस्वाल व संदिप ओली ,जिल्हा खजिनदार मिलींद सोनवणे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.निवड झालेल्या वेब मिडिया असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन तालुका व जिल्हा स्तरातून होत आहे.






