नवी दिल्ली : भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकवून देणाऱ्या मीराबाई चानूचं आज दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकवून देणारी मीराबाई ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यामुळे मीराबाईचे भारतात आगमन झाल्यावर दिमाखदार स्वागत करण्यात आले. चानूने भारताच्या विमानतळावर प्रवेश केला तेव्हा नेमकं घडलं तरी काय, याचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Weightlifter @mirabai_chanu receives a rousing welcome at Delhi Airport as she returns to India after clinching a silver🥈 medal at #TokyoOlympics
Let's welcome our champion with a loud cheer🗣️
Indiaaaaaa…India!#Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/8WFrDSJk1C
— PIB India (@PIB_India) July 26, 2021
THE CHAMPION IS BACK! 💪👧@mirabai_chanu returns home after making us proud at #TokyoOlympics @IndiaSports @ianuragthakur @Media_SAI pic.twitter.com/y18xrkJ65W
— DD News (@DDNewslive) July 26, 2021
यावेळी मीराबाईची कोरोना चाचणीही करण्यात आली. यावेळी बऱ्याच जणांनी मीराबाईबरोबर फोटो काढले, त्याचबरोबर बऱ्याच जणांची तिचे स्वागतही केले. शनिवारी मीराबाईंने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले, तेव्हा संपूर्ण देशाच्या आनंदाला पारावार उरला नाही. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावत मीराबाईने नवा इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. २१ वर्षांनी भारताने महिला वेटलिफ्टिंगचे ऑलिम्पिक पदक जिंकले आहे.त्यामुळे भारतामध्ये आनंदाचे वातावरण असून आज तिचे आगमनही झाले आहे.






