ऐश्वर्या राय बच्चनकडे पुन्हा गुडन्यूज? सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे सुरु झाली चर्चा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेत्रींनी चित्रपटात काम करणे सोडले तरी त्यांच्याविषयी फॅन्समध्ये चर्चा होत असतात. नुकतेच सोशल मिडीयावर करिनाच्या दुसऱ्या अपत्याची चर्चा ओसरत असतांनाच ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा आई होणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. ही चर्चा रंगण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो आहे. या फोटोत ऐश्वर्या राय प्रेग्नंट दिसत आहे या फोटोत तिच्यासोबत पती अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसुद्धा आहे.

ऐश्वर्याचा हा फोटो पाहून नेटिझन्सनी ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऐश्वर्या प्रेग्नंट आहे का, याबाबत नेटिझन्सनी सोशल मीडियावर विचारणाही केली आहे. पण अद्याप बच्चन कुटुंबाकडून याबाबत काही माहिती मिळालेली नाही. ऐश्वर्याने २०११ साली आराध्याला जन्म दिला होता. आराध्या आता ९ वर्षांची आहे.

ऐश्वर्या या फोटोमध्ये ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसते आहे. तिचं वजन वाढलेलं दिसतं आहे. शिवाय पोटही पुढे आल्यासारखं वाटतं आहे. तसंच ऐश्वर्या या फोटोत आपलं पोट लपवण्याचाही प्रयत्न करताना दिसते आहे. काही फोटोत तिने आपलं पोट दिसणार नाही, असाच प्रयत्न केला आहे. तर काही फोटोत तिने पोटावर हात ठेवला आहे.

फोटोंवरून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा फोटोत ऐश्वर्याला पाहून अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याची चर्चा झाली होती. मुंबईतल्या एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते. त्यावेळी ऐश्वर्याचा ड्रेस आणि तिची बॉडी लँग्वेज यावरून चर्चा सुरू झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here