अहमदनगर (प्रतिनिधी) : आज अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राहाता तालुक्यातील सावळीविहिर पंचायत समिती गणात एकूण ७ गावातील शाखाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब नाना खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व शिवसैनिकांशी संवाद साधत आगामी काळातील शिवसेनेची रणनीती स्पष्ट करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयजी काळे, उपजिल्हाप्रमुख अनिलजी बांगरे, तालुक्याचे नेते कमलाकरजी कोते आणि ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंदजी सिनगर यांनी अभियानाबाबत अधिक विस्तृत माहिती देत सदर पंचायत समिती गणातील स्थानिक शिवसैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाप्रमुख यांना विनंती केली.
यावेळी सावळीविहीर येथील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवत सर्वोत्तम गुण प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार व शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब नाना खेवरे यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, उपतालुकाप्रमुख भानुदास कातोरे, शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी, ग्राहक कक्षाचे शहरप्रमुख रवी सोनवणे, सावळीविहीर शिवसंपर्क अभियानाचे आयोजक उपतालुकाप्रमुख दिनेश आरणे, युवासेना तालुकाप्रमुख संदीप विघे, उपतालुकाप्रमुख किरण जपे, उपतालुकाप्रमुख रिंकेश जाधव, उपतालुकाप्रमुख प्रताप निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य मा.डॉ.शरद भदे व मा.साईनाथ झिंझाड, शाखाप्रमुख सागर कातोरे, ऋषिकेश मते, विवेक जपे, संतोष जाधव,चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब जगताप आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.






