उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी; मुख्यमंत्र्यांच्या व्हीआयपी दर्शनादरम्यान झाला गोंधळ

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे सोमवारी अनेक महिला व मुले जखमी झाली. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने, भाविकांची गर्दी होती. त्यातच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. यामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या गेटवर भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र लवकरच सुरक्षा कर्मचार्‍यांनी शिताफीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला.

सुरक्षेसाठी लावलेले बॅरीकेड पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यासंदर्भात महाकाळ मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महाकाल मंदिरातील गेट नंबर चार येथे ही घटना घडली. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने, भगवान महाकालच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तेथे अचानक आलेल्या जमावाने बॅरीकेड फेकले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि लोक मंदिरात जाऊ लागले. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, असेही सिंग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here